सिंधुदुर्ग - कामगारांमध्ये झालेल्या भांडणात एकाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण पाडेवार (३८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एकूण सहा जणावर बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघेजण अल्पवयीन असून इतर दोघेजण फरार आहेत.
सिंधुदुर्गातील बांदा-टोलनाका येथे कामगाराची हत्या
बांदा-टोलनाका येथे कामगारांमध्ये झालेल्या भांडणात एकाच मृत्यू झाला आहे.
बांदा सटमटवाडी येथील नियोजित सिमा तपासणी नाक्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यासाठी कर्नाटक येथील कामगार काम करतात. यामध्ये संशयित आरोपी परशुराम चलवाडी, परशुराम काखंटकी, यल्लामा उर्फ परशुराम चलवादी, लक्ष्मी परशुराम काखंटकी, इतर दोन संशयित रा. सर्व कर्नाटक अल्पवयीन आरोपी व मयत लक्ष्मण पाडेवार (३८) यांचे २२ ऑक्टोबररोजी दारुच्या नशेत असताना भांडण झाले. त्यामध्ये लक्ष्मणने संययित आरोपींना शिविगाळ केली. त्यावेळी त्यातील एकाने लक्ष्मणवर त्यांच्या हातात असलेल्या कोयतीची मुठ मारली. त्यावेळी तो पळून जात असता खाली पडला. त्यावेळी त्यातील एकाने डोक्यावर दगड मारून जखमी केले. त्यानंतर लक्ष्मण याला उपचारासाठी बांदा आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे नेले असता २४ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.