महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आडाळीतील प्रस्तावित वन संशोधन जागेची खासदार विनायक राऊतांनी केली पाहणी - विनायक राऊत लेटेस्ट न्यूज

अडाळी येथे आयुर्वेदिक रिसर्च सेंटरचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामाच्या जागेची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी केली.

mp vinayak raut
जागेची पाहणी करताना विनायक राऊत

By

Published : Aug 15, 2020, 9:05 PM IST

सिंधुदुर्ग - केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प असलेल्या आडाळी येथील प्रस्तावित आयुर्वेदिक रिसर्च सेंटरचे काम लवकरच सुरू होणार आहे. ३२.८ हेक्टर मध्ये हा प्रकल्प होणार आहे. या प्रस्तावित जागेची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आर्थिक सहाय्य करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

केंद्र सरकारने देशातील पहिल्या वन औषधी रिसर्च सेंटरला ( national Institute of medicinal plants(NIMP) मान्यता दिली आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील शंभर एकर जमीनीत हे सेंटर उभे राहाणार आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुका जगाच्या नकाशावर झळकणार आहे.या रिसर्च सेंटरमुळे साडेतीनशे वन‌औषधी यावर अभ्यास होणार आहे. यातून स्थानिक युवकांना रोजगार तसेच गावठी वैद्य तसेच आयुर्वेदिक डॉक्टर यांना याची मदत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेतीनशे पेक्षा जास्त वनऔषधी आहेत. त्यामुळे यावर रिसर्च करणारे आयुर्वेदिक रिसर्च सेंटर व्हावे अशी मागणी गेली अनेक वर्ष केली जात होती. शिवाय शासनाने एम आय डी सी साठी खरेदी केलेल्या सातशे एकर पैकी शंभर एकर जागेत हे सेंटर उभारण्यात यावे असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सादर केला होता. महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जळगाव जिल्हा असे दोन ठिकाणाचे प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारला सादर केले होते.

या प्रकल्पासाठी केंद्राने राज्य शासनाकडे जागेची मागणी केली आहे. सुरवातीला हे केंद्र जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर होते, परंतु तेथील हवामान पोषक नाही, तसेच पुरेशी जैवविविधता नाही. त्यामुळे हे केंद्र सिंधुदुर्गात आडाळी येथे हलविण्यात आले आहे. त्यासाठी येथील जागा प्रस्थावित करण्यात आली आहे. याच आडाळी एमआयडीसीतील जागेची खासदार राऊत यांनी पाहणी केली. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडळकर, कार्यकारी अभियंता परशुराम करावडे, उपअभियंता अविनाश रेवणकर, आरेखक कोष्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विकास कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर, डोंगरी विकास समिती सदस्य संजय गवस, विभाग प्रमुख मिलिंद नाईक, राजन मोर्ये, भगवान गवस आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details