महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये माकड तापाचे संकट, अलर्ट राहण्याच्या सूचना - Monkey fever in maharashtra

बांबोळी-गोवा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिह्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात आपण स्वतः गोवा प्रशासनाशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. माकडताप व कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

सिंधुदुर्गमध्ये माकड तापाचे संकट
सिंधुदुर्गमध्ये माकड तापाचे संकट

By

Published : Apr 21, 2020, 2:41 PM IST

सिंधुदुर्ग - बांदा, दोडामार्ग परिसरात माकड तापाचे रुग्ण आढळण्याची शक्यता वाढली आहे. पुणे येथून येणाऱ्या रक्त नमुना तपासणी अहवालाला वेळ लागत आहे. अशात लवकर अहवाल मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मणिपाल रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.

बांबोळी-गोवा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिह्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात आपण स्वतः गोवा प्रशासनाशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. माकडताप व कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

काही वर्षांपूर्वी बांदा हे माकडताप साथीचे मुख्य केंद्र होते. यावेळी मणिपालच्या सहाय्याने बांदा येथे रक्त तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. मणिपाल हॉस्पिटलने केंद्र बंद केल्याने रक्त तपासणी नमुने हे आठवडय़ातून एक दिवस दर गुरुवारी पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात येत आहेत.

आठवडय़ातून सोमवारी व गुरुवारी असे दोन दिवस नमुने तपासणीसाठी पाठवावेत व त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. मणिपाल रुग्णालयातून रक्त तपासणी अहवाल हे तात्काळ मिळत होते. यासाठी मणिपाल व्यवस्थापनाशी चर्चा करून पुन्हा ही सुविधा सुरू करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱ्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. माकड तापाचे रुग्ण सातत्याने आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेने अलर्ट राहून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details