महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 10, 2020, 3:10 AM IST

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग: कणकवली तालुका कोरोना हॉटस्पॉट, तालुक्यात २२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात कणकवली शहरालगत आणि तालुक्यातील कित्येक गावांमध्ये खरेदीची मोठी बाजारपेठ म्हणून कणकवलीकडे पाहिले जाते. मात्र, या शहराला सध्या कोरोनाच्या संकटाने विळखा घातल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. देवगड येथे चाकरमान्यांना मुंबईहून घेऊन येणाऱ्या 3 खासगी बस चालकांना कोरोना झाला आहे.

कणकवली
कणकवली

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७८ इतकी आहे. त्यापैकी ३४१ रुग्ण घरी परतले आहेत. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये सर्वाधिक २२४ रुग्ण कणकवली तालुक्यात आढळले आहेत. त्यामुळे, कणकवली तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. येथे नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २२४ झली आहे.

सिंधुदुर्गात कणकवली तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट

6 कोरोनाबाधितांमध्ये कणकवली शहरातील ५ आणि कलमठमधील एकाचा समावेश आहे. काही दिवसात गणेश चतुर्थी आहे. अशातच शहरात 6 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली शहर आणि लगतच्या गावांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. सध्या कोकणात चाकरमान्यांची रीघ लागली असून जिल्ह्यातही मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. या चाकरमानींबरोबरच स्थानिक लोकांमधूनही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. शिवसेना आमदार वैभव नाईक आणि युवा नेते संदेश पारकर यांच्या संपर्कातील रुग्ण संख्याही मोठी आहे. सध्या कणकवली बाजारपेठसह शहरात अनेक ठिकाणी कंन्टेन्मेंट झोन करण्यात आले आहेत.

गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात कणकवली शहरालगत आणि तालुक्यातील कित्येक गावांमध्ये खरेदीची मोठी बाजारपेठ म्हणून कणकवलीकडे पाहिले जाते. मात्र, या शहराला सध्या कोरोनाच्या संकटाने विळखा घातल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. देवगड येथे चाकरमान्यांना मुंबईहून घेऊन येणाऱ्या 3 खासगी बसेसच्या चालकांना कोरोना झाला आहे.

दरम्यान, कुडाळ तालुक्यातील लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची कोविड टेस्ट जलद करून मिळावी. त्यांना दूरवर टेस्टसाठी जावे लागू नये याकरीता आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्री. चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. खलिफे यांच्याशी संपर्क साधून रॅपिड टेस्ट किट व टेक्निशियन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ येथील विश्रामगृहामध्ये कोविड १९ रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान कणकवलीत वाढत जाणारी रुग्ण संख्या ही चिंतेची बाब बनली आहे.

हेही वाचा-तिलारी कालव्याच्या बोगद्याच्या तोंडावर डोंगर कोसळला, गोव्याकडे जाणारे पाणी बंद

ABOUT THE AUTHOR

...view details