महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 4, 2020, 1:07 PM IST

ETV Bharat / state

जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी; पालकमंत्री उदय सामंत

सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 67 टक्के असून मृत्युदर 2.2 टक्के आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून हा लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

implementation-of-strict-lockdown-in-the-district-till-july-8-guardian-minister-uday-samant
जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी; पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गावर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपययोजना केल्या जात आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून हा लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लॉकडाउनबाबतच्या परिस्थितीचा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढाव घेतला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी

कोरोनावर मात करण्यासाठी त्याचा संसर्ग रोखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 67 टक्के असून मृत्युदर 2.2 टक्के आहे. आर.टी.पी.सी.आर. लॅबमध्ये दररोज सुमारे 100 स्वॅब टेस्टिंग केले जातात. जिल्ह्यात आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 3967 जणांच्या स्वॅब टेस्ट झाल्या असून सध्या 69 रुग्ण उपचार घेत आहेत. लॉकडाउनमुळे या संख्येवर नियत्रंण आणत येईल. असे, पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. दरम्यान, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतलाजिल्ह्यामध्ये पोलिस बंदोबस्त चोख आहे तसेच रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातीस सर्व प्रवेशांच्या ठिकाणी नाकाबंदी करुन येणाऱ्यांची पूर्ण चौकशी करुन प्रवेश दिला जात आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details