सिंधुदुर्ग - प्रजासत्ताक दिनी जनतेचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून न सुटलेल्या प्रश्नांबाबत प्रत्येक महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री उदय सामंत घेणार 'जनता दरबार'
प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिळून 21 उपोषणे झाली. ही संख्या पाहता पालकमंत्री अवाक झाले. वारंवार मागणी, आंदोलने करूनही बरीच वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याचे यावेळी निदर्शनास आले. हे प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याच्या एका सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परीषद व अन्य सर्व विभागाचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित राहतील.

प्रशासनाकडे बरीच वर्षे अडकून पडलेले प्रश्न पालकमंत्री वा मंत्र्यांकडे गेल्यानंतर सुटू शकतात यावर जनतेचा विश्वास आहे. याची दखल घेत प्रशासनाकडून नेमका काय अन्याय झाला आहे तसेच समोरच्याला काय म्हणायचे आहे, हे समोरासमोर समजून घेतले जाणार असल्याचे ही ते म्हणाले.