सिंधुदुर्ग - ॲक्शन चांगली असेल तर रिॲक्शन चांगली असणार पण ॲक्शनच वाईट असेल तर रिॲक्शनही वाईट होणार, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात केले आहे. तसेच जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई करायची हे जिल्हाधिकारी ठरवतील, असेही त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
'जन आशीर्वाद यात्रेला आमचा विरोध नाही'
जन आशीर्वाद यात्रेला आमचा विरोध नाही. पक्ष वाढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु देशात गॅस, पेट्रोल, डिझेल व इतर सर्वच वस्तू महागल्या आहेत. ही महागाई कधी कमी करणार, जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी काय करणार याबाबत जनआशीर्वाद यात्रेत बोलले पाहिजे. मात्र शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठीच ही यात्रा काढली जात असल्याचा अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडे झालेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे देशात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे समोर आले आहे, असेही यावेळी सामंत म्हणाले.
'उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत'