महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये; त्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा फाडलाय - निलेश राणे - शिवसेना विरुद्ध भाजपा

खरे तर सामंत बंधूंचा ढोंगीपणाचा खरा चेहरा जनतेसमोर मी उघडकीस आणला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना सामंतांना भेटायचे नव्हतेच पण सामंत बंधू वशिल्याने गर्दीतून वाट काढत-काढत फडणवीस यांच्यासमोर येऊन उभे राहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटावे लागले, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.

सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये
सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये

By

Published : May 26, 2021, 7:06 AM IST

सिंधुदुर्ग- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसमोर मंत्री सामंत कसे ढोंग करतात, त्यांचा तो खरा चेहरा आज फाडला. दोन तासातच शिवसेनेचे आमदार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. सामंत कसली संस्कृतीची वार्ता करताय? अख्ख्या रत्नागिरीला माहिती आहे, २०१९ च्या निवडणुकीत तुमची सगळी संस्कृती काढली होती. सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये. माजी मुख्यमंत्री रत्नागिरीत येतात त्यावेळी सामंत भेटायला जात नाहीत. म्हणून ही राजकीय संस्कृती सामंतांच्या तोंडातून शोभत नाही, असा जोरदार प्रहार भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी सामंतावर केला आहे.

सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये

स्कृतीची भाषा सामंतांनी करू नये कारण त्यांच्या तोंडी ती शोभत नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी एकदिवस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या भेटीमुळे मंत्री उदय सामंत चांगलेच अडचणीत आले आहेत. याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर उदय सामंत यांना खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली. ही पत्रकार परिषद म्हणजे मातोश्रीवर अडचणीत आल्याने, निव्वळ सारवासारव असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. 'खरे तर सामंत बंधूंचा ढोंगीपणाचा खरा चेहरा जनतेसमोर मी उघडकीस आणला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना सामंतांना भेटायचे नव्हतेच पण सामंत बंधू वशिल्याने गर्दीतून वाट काढत-काढत फडणवीस यांच्यासमोर येऊन उभे राहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटावे लागले, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये, कारण त्यांच्या तोंडी ती शोभत नाही. मातोश्रीवर या सगळ्या गोष्टी चालत नाही, हे सामंतांना महिती आहे. त्यामुळे आहे ते मंत्रिपद वाचवण्यासाठी उदय सामंताना हा खुलासा करावा लागला, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

मी केलेले आरोप हे सामंतांचा खरा चेहरा दाखवण्यासाठी-

ते पुढे म्हणाले की, मी केलेले आरोप हे सामंत यांचा खरा चेहरा दाखवण्यासाठी केले होते. शिवसैनिकांसमोर आणि उद्धव ठाकरेंसमोर सामंत जे ढोंग करतात तो खरा चेहरा मी उघडकीस आणला. या सामंतांनी कधीच दखल घेण्यासारखे काम केले नाही. त्यामुळे ते दखल घेण्यासारखेही नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. सामंतांनी जनसेवा करावी, लोकांची कामे करावीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, वादळ येऊन गेले आहे. फक्त आपला व्यवसाय टिकवण्यासाठी आणि भविष्यात भाजप येणार हे नक्की असल्यामुळे पुढची पेरणी करायची, म्हणजे उद्या अडचणीचे वाटलं तर उडी मारायला बरी, हे सामंतांचे जुने धंदे असल्याचे सांगत निलेश राणे यांनी उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चिरफाड केली.


ABOUT THE AUTHOR

...view details