महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार आहे - निलेश राणे - nilesh rane on mahavikas aghadi government

भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी मनाई आदेश झुगारून आज शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली.

Former MP Nilesh Rane
माजी खासदार निलेश राणे

By

Published : Feb 19, 2021, 5:02 PM IST

Updated : Feb 19, 2021, 6:15 PM IST

सिंधुदुर्ग -भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी मनाई आदेश झुगारून आज शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार आहे. असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

माजी खासदार निलेश राणे

शिवनेरीवर शिवभक्तांना १४४, मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले

शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांना १४४ लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा झालेला हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या ठिकाणी शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावू दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे संभाजी राजेंनी यांच्या मागे फरफटत जाऊ नये. महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे, असेही निलेश राणे म्हणाले.

हेही वाचा -छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरवणार- मुख्यमंत्री ठाकरे

सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट

शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांना द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. या सरकारचे शिवाजी महाराजांंवरचे प्रेम डुप्लिकेट आहे. किती वर्षे झाली शिवस्मारकाला? इतकी वर्ष होऊनही या स्मारकासाठी हे सरकार पैसे देऊ शकलेले नाही. जाहीर केलेले पैसेही द्यायला सरकारला जमत नाही. कोरोनाचे कारण सांगताहेत. शिवरायांबद्दलचे शिवसेनेचे प्रेम हे केवळ दाखविण्यासाठी आहे, लोकांना मूर्ख बनविण्यासाठी आहे, हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाच लक्षात आले आहे, असेही निलेश राणे यावेळी म्हणाले.

शिवरायांच्या गादीचा अपमान होऊ देणार नाही

शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या गादीचा अपमान झालेला आहे. शिवरायांच्या गादीचे वारस असलेल्या छत्रपती संभाजी राजे यांनी हे सहन करू नये. त्यांनी फक्त हाक द्यावी त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील. असेही निलेश राणे यावेळी म्हणाले.

निलेश राणेंचे शक्तिप्रदर्शन, पोलिसांनी रोखली रॅली

मालवणमध्ये देऊळवाडा ते मालवण किल्ला जेठीपर्यंत मोटारसायकल रॅली काढत निलेश राणे यांनी यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मालवण एसटी बसस्टँड पूर्वी पोलिसांनी निलेश राणे यांची रॅली रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर चर्चेतून ही रॅली शांततेत पुन्हा सुरू झाली.

हेही वाचा -१२ वर्षांच्या जिया रायचा विश्वविक्रम!

Last Updated : Feb 19, 2021, 6:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details