सिंधुदुर्ग (कुडाळ)- पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुडाळचे वनक्षेत्रपाल आणि लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. झाडतोडीचा परवाना देण्यासाठी दोघांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तेव्हा तक्रारदाराने लाचलुचपत विभागामध्ये आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने साफळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.
5 हजाराची लाच स्वीकारताना कुडाळ वनक्षेत्रपाल आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात - clark
या प्रकरणातील तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक आहेत. त्यांनी झाडतोडीचा परवाना मिळण्यासाठी कुडाळ कार्यालयात रीतसर प्रकरण सादर केले होते. मात्र या प्रकरणाच्या मंजुरीसाठी कुडाळ वनक्षेत्रपाल आणि त्यांचा लिपिक या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
प्रदिप गोविंदराव कोकितकर (वय 40, रा. कुडाळ एमआयडीसी, मुळ रा. गडहिंग्लज) व रविंद्र भिकाजी भागवत (वय 56, रा. कुडाळ, मुळ रा. तळेरे) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई लाचलुचपत शाखेचे पोलीस उपाधिक्षक दिपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक आहेत. त्यांनी झाडतोडीचा परवाना मिळण्यासाठी कुडाळ कार्यालयात रीतसर प्रकरण सादर केले होते. मात्र या प्रकरणाच्या मंजुरीसाठी कुडाळ वनक्षेत्रपाल आणि त्यांचा लिपिक या दोघांनी तक्रारदार याच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.