सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेले दोन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे मालवणातील मसुरेसह इतर गावात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मसुरे-मागवणे मार्गावर रमाई नदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर, बागायत पूलानजीक पूराचे पाणी आल्याने बेळणे-कणकवली मार्ग सुद्धा बंद झाला आहे.
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, मालवणातील अनेक गावात पूरसदृश परिस्थिती - सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस न्यूज
या पावसामुळे गडनदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे टोकळवाडी येथे नदीचे पाणी पात्राबाहेरून वाहू लागले आहे. भगवंतगड कॉजवे वरती पाणी आल्याने बांदिवडे आचरा मार्ग सुद्धा बंद झाला आहे. बागायत, वेरली, देऊळवाडा, मार्गाचीतड, मसुरे, मागवणे, कावावाडी, बांदिवडे, सैय्यद जुवा, भगवंतगड, खाजणवाडी आदी भागातील शेतीत पाणी भरल्याने भात शेतीची कामे खोळंबणार आहेत.

या पावसामुळे कुठेही पडझडीची घटना घडली नसली तरी बागायत येथे वीज तारांवर झाड कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. पाऊस वाढल्यास सायंकाळनंतर पाण्याचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मसुरे हे गाव खाडी किनारी असल्याने या भागात पुराचा मोठा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.