महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आवाहन - मासेमारी बातमी

समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jun 1, 2020, 7:24 AM IST

सिंधुदुर्ग - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनांक 4 जूनपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. समुद्र खवळलेला राहणार आहे.

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आवाहन

वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी, विभागाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.

हेही वाचा -सिंधुदुर्गात मुसळधार पावसाला सुरुवात; चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details