महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कणकवलीत काजू बागायतीला आग, लाखोेंचे नुकसान - सिंधुदुर्ग काजू बागायतदार

ऐन काजू-आंब्याच्या हंगामातच अचानक आग लागल्याने येथील काजू बागायतदारांवर संकट ओढवले असून बायागतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Cashew
कणकवलीत काजू बागायतीला आग, लाखोेंचे नुकसान

By

Published : Apr 21, 2020, 8:52 AM IST

सिंधुदुर्ग- कणकवली तालुक्यातील असलदे येथील वेताळाचा माळ येथील काजू आंबा बागायतीला सोमवार दुपारी लागलेल्या आगीत १ हजार झाडे जळून खाक झाली आहेत. ऐन काजू-आंब्याच्या हंगामातच अचानक आग लागल्याने येथील काजू बागायतदारांवर संकट ओढवले असून बायागतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या कोरोनाचे संकट असल्याने बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे काजूला आधीच उचल नसल्यामुळे बागायतदारांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर कोकणातील आंबा व काजुला भाव मिळत नसल्याने तेही आर्थिक संकटात सापडले आहेत. यातच असलदे येथील वेताळाचा माळ येथे लागलेल्या आगीत येथील शेतकरी व बागायतदार दत्तात्रय गंगाराम तांबे, आत्माराम घाडीगांवकर, सुनील भागोजी तांबे, अनंत तांबे, बळीराम तांबे यांच्या मालकीची १ हजारहुन अधिक काजू आणि आंबा झाडे जळून खाक झाली असल्याने ऐन काजु व आंब्याच्या हंगामात लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. या बागायतींची तत्काळ कृषी सहाय्यक हेमंत बुधावळे, सरपंच गुरूप्रसाद उर्फ पंढरीनाथ वायगणकर, कोतवाल मिलिंद तांबे आदींनी पाहणी करून बागायतदारांचे नुकसान जाणून घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details