महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sindhudurg District Bank Election 2021 : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या 19 जागांसाठी आज मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी आज(दि. 30 डिसेंबर)रोजी होत आहे. यामध्ये 39 उमेदवार (Sindhudurg District Bank) निववडणूक रिंगणात आहेत. (Sindhudurg District Bank Election 2021 ) संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अटकपूर्व जामिनावर आज निर्णय होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक

By

Published : Dec 30, 2021, 7:18 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 30 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत 19 पैकी 18 प्रभागात एकास एक लढत तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष (Case Against Nitesh Rane) मडव यानी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. (Sindhudurg District Bank Election 2021) तर, 31 डिसेंबरला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून आहेत. केंद्रात नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

आजी माजी चेअरमन रिंगणात

जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत हे शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध (Union Minister Narayan Rane) भाजपच्यावतीने विठ्ठल देसाई रिंगणात असून लक्षवेधी दुरंगी लढत आहे. या मतदारसंघात तिसरे उमेदवार सुशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दुरंगी लढत होत आहे. (Attack on Santosh Parab) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होत आहे.

कुडाळ वगळता सर्व ठिकाणी दुरंगी लढत

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 19 संचालकपदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधून 22 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कुडाळ वगळता सर्व ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. कुडाळ शेती उत्पादन मतदारसंघातून प्रकाश मोर्ये (भाजप), सुभाष मडव (भाजप) तर महाविकास आघाडीचे विद्या प्रसाद दयानंद बांदेकर अशी तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे शेती उत्पादनाच्या मतदारसंघात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.

दिग्गज महिला महिला प्रतिनिधी मतदारसंघातून उभ्या

महिला प्रतिनिधी मतदारसंघातून होणाऱ्या या लक्षवेधी निवडणुकीत कणकवलीत प्रज्ञा ढवण, अस्मिता बांदेकर (भाजप) विरुद्ध कुडाळ येथील नीता राणे व सावंतवाडीच्या अनारोजी लोबो (महाविकास आघाडी) यांच्यात लढत होणार आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर यांच्यात लढत होणार आहे. इतर मागास मतदारसंघातून होणाऱ्या दुरंगी लढतीत भाजपचे रवींद्र मडगावकर विरुद्ध महाविकास आघाडीचे मनिष पारकर यांच्यात लढत होणार आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपचे गुलाबराव चव्हाण आणि महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी यांच्यात लढत होत आहे.

भाजपचे समीर सावंत विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास सावंत यांच्यात लढत

जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था ग्राहक सहकारी शेती संस्था या मतदारसंघातून उभे असून भाजपचे विद्यमान संचालक अतुल काळसेकर यांच्यात लक्षवेधी लढत होणार आहे. औद्योगिक सहकारी मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटर वाहतूक संस्था या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे लक्ष्मण उर्फ बाबा आनंद आंगणे विरुद्ध भाजपाचे गजानन गावडे यांच्यात लढत होत आहे. मच्छिमार सर्व दूध संस्था कुकूटपालन वराह पालन जनावरे पैदास संस्थांमधून महाविकास आघाडीचे एम. के. गावडे विरुद्ध भाजपचे महेश सारंग यांच्यात लढत होत आहे. विणकर घरबांधणी देखरेख संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीचे विनोद रामचंद्र मर्गज विरुद्ध भाजपचे संदीप परब यांच्यात लढत होत आहे. सर्व बिगर सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे समीर रमाकांत सावंत विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास सावंत यांच्यात लढत होणार आहे.

सोबती दुरावल्याचा राणेंना फटका बसू शकतो

शेती संस्था मालवण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे व्हिक्टर डाट्स विरुद्ध भाजपचे कमलाकांत कुबल यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था सावंतवाडी मतदार संघातून भाजपचे गुरुनाथ पेडणेकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विद्याधर परब यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था दोडामार्ग तालुका मतदारसंघमधून भाजपचे प्रकाश गवस विरुद्ध महाविकास आघाडीचे गणपत देसाई यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था देवगड तालुका मतदारसंघातून भाजपचे प्रकाश बोडस विरुद्ध महाविकास आघाडीचे अविनाश माणगावकर यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था वैभववाडी तालुका मतदार संघातून भाजपाचे दिलीप रावराणे विरुद्ध महा विकास आघाडीचे दिगंबर पाटील तर शेती संस्था वेंगुर्ले मतदारसंघातून भाजपाचे मनीष दळवी विरुद्ध महाविकास आघाडीचे विलास गावडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. 19 मतदारसंघात 981 मतदार आहेत. गेली तीन टर्म या बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. पण गेल्या पाच वर्षात राजकीय पटलावर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर राणेचे खंदे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते काका कुडाळकर, सतीश सावंत हे सोबती दुरावले. याचा फटका राणेंना बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा -नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी; आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details