सिंधुदुर्ग - मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून सिंधुदूर्गमध्ये दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मात्र जिल्ह्यात अलगीकरणाची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मर्यादित असल्याचे सांगत यापुढे प्रवाशांना जिल्ह्यात येण्यासाठी पास न देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
सिंधुदुर्गात परतणाऱ्या चाकरमान्यांना पास देणे थांबवा, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मींचे पोलीस आयुक्तांना पत्र
बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना सिंधुदुर्गात परतण्यासाठी पासेस देऊ नका, असे पत्र जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पोलीस आयुक्तांना लिहिले आहे.
विलिगीकरण कक्षात सर्वांना सामावून घेण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच आरोग्य सुविधा ही मर्यादित असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यात येण्यासाठी प्रवासी पास दिले जाऊ नयेत.अन्यथा जिल्ह्याला कोव्हिड-19 च्या संकटाला सामोरे जाणे कठीण होईल, अशा आशयाचे पत्र सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. दरम्यान, यापुढे इतर चाकरमान्यांना पास न देण्यासाठी कळवले आहे. जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती बघता चाकरमान्याच्या जिल्ह्यात परतण्यापुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहेत. त्यांच्या परतण्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत.