महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शक्तिप्रदर्शन करत दीपक केसरकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; राजन तेलींनी अर्ज भरल्याने भाजपची बंडखोरी? - dipak kesarkar

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना केसरकरांनी राजकीय दहशतवादावर भाष्य केले. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आल्याचे सांगितले. सर्वांगीण विकासासाठी मला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.

शक्तिप्रदर्शन करत दीपक केसरकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; राजन तेलींनी अर्ज भरल्याने भाजपची बंडखोरी?

By

Published : Oct 4, 2019, 7:22 AM IST

सिंधुदुर्ग - दीपक केसरकर यांनी गुरुवारी सावंतवाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार शंकर कांबळी, ज्येष्ठ शेतकरी नेते वसंत केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जान्हवी सावंत यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शक्तिप्रदर्शन करत दीपक केसरकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; राजन तेलींनी अर्ज भरल्याने भाजपची बंडखोरी?

हेही वाचा -'रोड नाही, तर व्होट नाही' रस्त्याअभावी पिंपळगाववासियांची फरफट

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना केसारकरांनी राजकीय दहशतवादावर भाष्य केले. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आल्याचे सांगितले. सर्वांगीण विकासासाठी मला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा -भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही

खासदार विनायक राऊत यांनी बोलताना नारायण राणे यांचे नाव न घेता खोचक टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी पक्ष जन्माला घातला. त्याचे बारसे झाले नाही. मुलेबाळे नाहीत आणि तो विलीन केला. एकेकाळी शिवसेना संपवायला निघालेल्या या नेत्याला स्वतःचा स्थापन केलेला पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करावा लागतो. यातच सर्व काही आले. असे सांगून दीपक केसरकर यांना गेल्यावेळी पेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा -मनसेची तिसरी यादी जाहीर, 32 जणांच्या नावाचा समावेश

दरम्यान, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी देखील मोठे शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेद्वारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सावंतवाडी मतदार संघात महायुतीत बंडखोरी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details