महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'दीपक केसरकर शिवसेनेत नाराज, नवा मार्ग निवडणार' - sindhudurg politics latest news

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वाद सुरू असताना आमदार दीपक केसरकर गप्प आहेत, याचा अर्थ ते आता दुसऱ्या मार्गावर आहेत. शिवसेनेतीलच लोक केसरकर भाजपात जातील, असे सांगत आहेत. असेही उपरकर म्हणाले.

deepak kesarakar
दीपक केसरकर, शिवसेना नेते

By

Published : Jun 28, 2020, 6:59 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत नाराज आहेत. ते सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून आगामी काळात लोकसभा उमेदवार म्हणून ते काम करतील, असा गौप्यस्फोट मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वाद सुरू असताना आमदार दीपक केसरकर गप्प आहेत, याचा अर्थ ते आता दुसऱ्या मार्गावर आहेत. शिवसेनेतीलच लोक केसरकर भाजपात जातील, असे सांगत असल्याचेही उपरकर म्हणाले.

परशुराम उपरकर, मनसे नेते

शरद पवार यांना उदबत्ती ओवाळून मी बाहेर पडतो, असे म्हणणारे केसरकर दोन महिन्यांत आपली निष्ठा बदलतात आणि शिवसेनेत जातात. आता त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळेही ते नाराज असल्याचेही उपरकर म्हणाले.

२०१४च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या विरोधात झेंडा फडकावत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी २ महिन्यांतच शिवसेनेत प्रवेश केला. पुढे २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर केसरकरांना युती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली होती. आता तेच केसरकर शिवसेनेत नाराज असून भाजपामध्ये प्रवेश करतील किंवा राजकारणातून निवृत्ती घेतील, असेही उपरकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details