महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात 'चढणीचे मासे' पकडण्यासाठी लोकांची झुंबड - fishering in sindhudurg news

एरवी कोकणात आणि डोंगराळ भाग लागून असलेल्या तलावांमध्ये पावसाळ्यात मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतात आणि नेमक्या ठिकाणी अंडी घालतात. या वैशिष्ट्यामुळे या माशांना 'चढणीचे मासे' म्हटले जाते.

Crowd of people to catch climbing fish in sindhudurg
चढणीचे मासे पकडण्यासाठी नाल्यांवर झुंबड

By

Published : Jun 16, 2020, 6:39 PM IST

सिंधुदुर्ग -जिल्ह्यात मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पाऊस कोसळत आहे. यात नदी-ओहोळातील पाण्याची पातळी वाढत असल्याने तेथील मासे उलट्या दिशेने धाव घेत आहेत. असे मासे पकडण्यासाठी मत्स्य खवय्यांची ओहोळावर गर्दी वाढू लागली आहे.

एरवी कोकणात आणि डोंगराळ भाग लागून असलेल्या तलावांमध्ये पावसाळ्यात मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतात आणि नेमक्या ठिकाणी अंडी घालतात. या वैशिष्ट्यामुळे या माशांना 'चढणीचे मासे' म्हटले जाते. नद्यांच्या पाण्याला यावेळी वेग असतो. पूर-महापुरात चढणीचा उत्साह अधिक असतो. पुराच्या वेगापेक्षाही चढणीच्या माशांचा वेग अधिक असल्याने हे मासे विरुद्ध दिशाही सहज पार करून जातात. कधी नाले तर थेट शेतापर्यंत पोहोचतात. या काळात हजारो अंडी पोटात घेऊन हे मासे पोहत असतात.

चढणीचे मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड

या माशांवर ताव मारण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाटेत जाळ टाकून बसतात. सध्या जिल्ह्यात हे चित्र लक्षवेधी ठरत आहे. साधारणपणे माशांचा उतरणीचा प्रवास उत्तरा नक्षत्रात तर चढणीचा प्रवास मृग नक्षत्रात असतो. वर्षानुवर्षांचा माशांचा प्रवास प्रत्येक पिढीला ज्ञात झाल्याने खवय्यांची नदी-ओहोळांवर गर्दी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details