महाराष्ट्र

maharashtra

'तौक्ते'मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3, 375 हेक्टर क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान

By

Published : May 18, 2021, 7:35 PM IST

Updated : May 18, 2021, 7:44 PM IST

किनारी भागात आंबा आणि अन्य बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेताना पंचनामे करण्यातही अन्य तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची मदत किनारी तालुक्यात घेतली जात आहे.

तौक्ते चक्रीवादळ इम्पॅक्ट
तौक्ते चक्रीवादळ इम्पॅक्ट

सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळ इम्पॅक्ट

हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 कोटी 77 लाखांचे नुकसान, दोघांचा मृत्यू

काजू बागायतीचे झाले मोठे नुकसान

बागेनुसार झालेले नुकसान मोठे आहे. यामध्ये आंबा - 1 हजार 110.42 हेक्टर, काजू - 2 हजार 119.48 हेक्टर, नारळ - 110.58 हेक्टर, सुपारी - 12.38 हेक्टर, कोकम - 18.40 हेक्टर तर केळी - 3.90 हेक्टर क्षेत्र या प्रमाणे नुकसान झाले आहे. आंब्याच्या 277.61 हेक्टर क्षेत्रावर फळगळ झाली असून 832 हेक्टर क्षेत्रावरील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. काजूच्या 1 हजार 801.56 हेक्टरवरील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तर 317.92 हेक्टरवरील झाडे उन्मळून पडली आहेत. नारळाची एकूण 11.6 हेक्टर क्षेत्रावरील झाडे मोडली असून 99.52 हेक्टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत. सुपारीच्या 12.38 हेक्टर क्षेत्रावरील झाडे मोडून पडली आहेत. कोकमच्या 16.56 हेक्टरवर फळगळती झाली असून 1.84 हेक्टर क्षेत्रावलील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. केळीच्या 3.90 हेक्टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत.

नुकसानीच्या पंचनाम्यांना तातडीने सुरवात

या चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना तातडीने सुरवात करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, की जिल्ह्यात वादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक भागात आजही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. यासाठी आम्ही बाहेरच्या जिल्ह्यातून अधिकचे मनुष्यबळ मागवले आहे. तर खासगी ठेकेदारांची माणसेही वीजसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किनारी भागात आंबा आणि अन्य बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेताना पंचनामे करण्यातही अन्य तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची मदत किनारी तालुक्यात घेतली जात आहे.

हेही वाचा -'ईटीव्ही भारत' विशेष - चक्रीवादळाचा महावितरणला फटका, विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी 144 पथके कार्यरत

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटता महावितरणला

चक्रीवादळामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लोटेन्शन आणि 130 हायटेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरीत सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळ मागवण्यात आले.

Last Updated : May 18, 2021, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details