सिंधुदुर्ग -देवगड तालुक्याच्या टेंबवली येथील 79 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला दिनांक 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. दिनांक 23 मे रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्वसनाचा आजार होता, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
मुंबईतून सिंधुदुर्गमध्ये आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू - सिंधुदुर्ग कोरोना बातम्या
टेंबवली येथील 79 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला दिनांक 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कणकवली तालुक्याच्या बावशी येथील एक, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील एक, देवगड तालुक्यातील वाडा येथील एक, वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील एक, सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील एक आणि देवगड तालुक्यातील टेंबवली येतील मृत्यू झालेल्या महिलेचा एक असे एकूण 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 30 इतकी झाली आहे. यापैकी 7 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे.