महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आवश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे - के.मंजुलक्ष्मी - haivy rain news in sindhudurg district

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणीपातळीत वाढ होऊन, इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. त्या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग
के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

By

Published : Jul 22, 2021, 9:38 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यामध्ये 25 जुलैला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्याही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घराबारे जाणे टाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने, त्यांनी हे आवाहन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असेल, तरच घराबाहे जा, अन्यथा घराबाहेर जाणे टाळा, असे आवाहण केले आहे

नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणी पातळीत वाढ होऊन, इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. नदी काठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज असून, सावधानतेचा इशारा दिला आहे. कणकवली येथील गड नदीमधीलही पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने, काही ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने, वाहतूक बंद केली आहे. करुळ आणि भूईबावडा घाट बंद असून, फोंडा आणि आंबोली मार्गे अजून वाहतूक सुरू आहे.

आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता

आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. अत्यंत आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे. प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी तसेच, मदतीसाठी (1077)या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

अतिवृष्टीमुळे पाच घरांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे-गावधनवाडी येथील श्रीमती जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या गोठ्याचे, उंबर्डे - भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्री यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी - तळगाव येथील राजाराम तुकाराम चव्हाण यांचे जुने घर पडून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली

दोडा मार्गातही अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यात भेडशी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच, घोडगेवाडी- केर, परमे-भेडशी, उसप-खोक्रल, खोक्रल-मांगेली या मार्गांवरही पाणी आल्याने, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर अजूनही पाणी असून, वाहतूक बंद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details