महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गतील आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या गुन्हेगारीवर आता सीसीटीव्हीची नजर

By

Published : Dec 22, 2020, 5:41 PM IST

सिंधुदुर्गातील आंबोली हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी मोठ्या दऱ्या आहेत. त्यामुळे येथील खोल असलेल्या दऱ्या आणि झुडपे याचा अवैध धंद्यासाठी उपयोग होताना दिसत आहे.

पालकमंत्री उदय सामंत
पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग - आंबोली या पर्यटनस्थळी दरीमध्ये मृतदेह टाकण्याचे प्रकार आणि अवैध धंदे वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 52 लाख रुपये निधी खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टुरिझमसाठी पोलिसांना तीन गाड्या देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पालकमंत्री उदय सामंत

आंबोलीत मृतदेह टाकण्याचे प्रमाण वाढले-

सिंधुदुर्गातील आंबोली हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी मोठ्या दऱ्या आहेत. त्यामुळे येथील खोल असलेल्या दऱ्या आणि झुडपे याचा अवैध धंद्यासाठी उपयोग होताना दिसत आहे. या ठिकाणी दरीमध्ये आतापर्यंत अनेक मृतदेह टाकण्यात आल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अशा अवैध धंद्यांना रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून ५२ लाख रुपये निधी खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील अवैध धंदे रोखण्याच्या दृष्टीने टूरिझमसाठी पोलिसांना तीन गाड्या देण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

जिल्ह्यात अवैध धंद्यावर होणार कारवाई-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यावर आता कारवाई होणार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर पासून आतापर्यंत गोवा बनावटीची ४ कोटी रुपयांची दारू जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली पकडली गेली आहे. सर्वात मोठी कारवाई ही ९५ लाखाची झाली आहे. जिल्ह्यात आंबोली या पर्यटन स्थळावर मृतदेह टाकण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अखत्यारीत आम्ही आणत आहोत, असेही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्यासोबत माझी बैठक झाली. त्यांनी अचानक या ठिकाणी भेट द्यावी त्यातून बऱ्याच गोष्टी चांगल्या घडू शकतात, अशी आपण त्यांना सूचना केली असून त्यांनी ती मान्य केल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा-उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार, भाजपला टीका करण्यात 'भारतरत्न' द्या - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details