सिंधुदुर्ग - तळकोकणात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाच्या निर्मला नदीला मोठा पूर आला. त्यामुळे या नदीवर बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. पुरामुळे परिसरातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे.
सिंधुदुर्गला मुसळधार पावसाने झोडपले; २७ गावांचा संपर्क तुटला
कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाच्या निर्मला नदीला मोठा पूर आला. त्यामुळे या नदीवर बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे.
आंबेरी निर्मला नदीचा ब्रिटिशकालीन पूल
पहाटेपासून पुलावरुन पाणी जात असल्याने कामावर तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी काही अतिउत्साही नागरिक आपला जीव धोक्यात घालून पूल पार करण्याचा प्रयत्न करत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली होती. मात्र अद्याप मधून मधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे वारंवार २७ गावाचा संपर्क तुटत आहे.