सिंधुदुर्ग -कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुडाळमध्ये नाईक यांना गडबड घडवायची होती. त्यामुळेच त्यांनी जिथे निवडणूक प्रक्रिया सुरू होती तिथे घुसण्याचा प्रयत्न केला. इतके घाणेरडे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. वैभव नाईक हे दिवसागणिक खालची पातळी गाठत चालले आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. कुडाळ येथे राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
- 'शिवसेनेने उड्या मारु नये'
नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ असताना सुद्धा काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवावा लागला हेच आमदार वैभव नाईक यांचे अपयश आहे, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाचा प्रयत्न फसला असला तरी, भविष्यात नक्कीच या ठिकाणी भाजपाचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसला असला तरी मात्र, कुडाळवर शिवसेनेचा भगवा फडकलाच नाही. शहरावर काँग्रेसचा झेंडा फडकला, त्यामुळे शिवसेनेने उड्या मारू नयेत, असाही टोला त्यांनी लगावला.
- 'इतके घाणेरडे राजकारण आजपर्यंत झाले नाही'