सिंधुदुर्ग - चिपी विमानतळाच्या बाबतीत सत्ताधारी फक्त वल्गना करत आहेत. मात्र हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्राथमिक गोष्टी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. रस्ता, पाणी, वीज, इंटरनेट या सुविधा आजही इथे पोचलेल्या नाहीत. अस असताना केवळ श्रेयाच राजकारण पालकमंत्री, खासदार, आमदार करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. तर महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर नापास झाल्याने जिल्ह्यात 70 पैकी 60 ग्रामपंचायती भाजपाकडे येतील, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
चिपी विमानतळाच्या बाबतीत सत्ताधारी फक्त वल्गना करतायेत - भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली - maha vikas aghadi govt news
चिपी विमानतळाच्या बाबतीत सत्ताधारी फक्त वल्गना करत आहेत. मात्र हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्राथमिक गोष्टी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. रस्ता, पाणी, वीज, इंटरनेट या सुविधा आजही इथे पोचलेल्या नाहीत. अस असताना केवळ श्रेयाच राजकारण पालकमंत्री, खासदार, आमदार करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे.
विमानतळावर पोहचायला आजही रस्ता चांगला नाही
सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नारायण राणे यांच्या प्रयत्नाने घोषित झाला आहे. त्याकरता विमानतळ अत्यंत महत्वाचे आहे. मात्र आजही याठिकाणी विमानतळ अत्यंत सुंदर झालेले असताना त्या ठिकाणी पोहचायला रस्ता चांगला नाही, पाण्याची सोय नाही अशी स्थिती आहे. राज्यातील अनेक विमानतळ प्राथमिक सुविधा नसल्याने बंद झाले आहेत. या गोष्टी राज्य सरकारच्या हातातील आहेत. त्या पूर्ण करायला सरकारचे कोणी हात बांधले होते का? असा प्रश्नही राजन तेली यांनी विचारला. नारायण राणे यांनी संबधित अधिकाऱ्यांना याबाबतीत सूचना केल्या असून विमानतळ कंपनीचे मालक म्हैसकर यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आहे. संबधित सुविधांसाठी आवश्यक रक्कम आपण संबधित विभागाकडे जमा करा, अशी सूचनाही त्यांना केल्याचे तेली म्हणाले.