सिंधुदुर्ग - कुडाळ पिंगुली येथील ठाकर आदिवासी लोक कलावंत शिवदासकुमार गणपत मस्के या तरुणाने कळसूत्री बाहुल्यांच्या व्हिडिओमधून कोरोनाशी कसे लढाल, यावर प्रबोधन करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ हा लोककलेतील एक प्रभावी व लोकप्रबोधनकारी खेळ मानला जातो.
कोरोनाविरुद्ध कसे लढाल.. लोक कलावंताचे कळसूत्री बाहुल्यांच्या व्हिडिओतून प्रबोधन
कुडाळ पिंगुली येथील ठाकर आदिवासी लोक कलावंत शिवदासकुमार गणपत मस्के या तरुणाने कळसूत्री बाहुल्यांच्या व्हिडिओमधून कोरोनाशी कसे लढाल, यावर प्रबोधन करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.
अलीकडे या बाहुल्यांचा खेळ पाहायला मिळत नाही. मात्र, सोशल माध्यमातून या बाहुल्यांच्या खेळाचा उपयोग समाज प्रबोधनासाठी अत्यंत प्रभावीपणे करण्याचा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यात केला जात आहे. कुडाळ पिंगुली येथे ठाकर आदिवासी लोककलावंत बांधवांनी आपली ही लोककला गेली कित्येक वर्ष जोपासली आहे. आताची नवी पिढी या कलेला ग्लोबल करतानाच सोशल माध्यमातूनही या कलेतून लोकप्रबोधन करत आहे. कोरोनाने सारे जग व्यापले असताना या आजाराला कसे सामोरे जावे आणि कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती या कलेतून दिली जात आहे या कलेला लोकांची चांगली दादही मिळत आहे.