महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिलारी धरणाचे दरवाजे उघडल्याने किनारी भागात सतर्कतेचा इशारा - sindhudurg rain

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

By

Published : Sep 6, 2019, 12:28 PM IST

पणजी -गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील तिलारी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पोलीस आणि तिलारी प्रकल्प कार्यालयाकडून गस्त घालण्या बरोबरच लाऊड स्पीकरवरून इशारा दिला जात आहे.

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण परिसरात पावसाची संततधार महिनाभरापासून सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. तिलारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे डिचोली तालुक्यातील साळ गावाला पुराचा फटा बसला होता. येथील 15 घरांना आठवडाभर पाण्याने वेढा दिला होता. त्यामुळे शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

हेही वाचा - तळकोकणात मुसळधार पाऊस; माणगाव-आंबेरी पूल पाण्याखाली, २७ गावांचा संपर्क तुटला

तिलारी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखण्यासाठी सध्या धरणाचे चारही धरणाचे उघडण्यात आले आहे. यासाठी मागील चार दिवसांपासून यामध्ये पाणी सोडण्यासाठी तिलारी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच ज्या गावांना आणि वस्त्यांना महिनाभरापूर्वी पुराचा फटका बसला तेथे तिलारी प्रकल्प विभाग आणि पोलिसांकडून वाहनात लाऊन स्पीकरवरून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.

हेही वाचा - भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील धामणे धरणही मोठ्या प्रमाणात भरले आहे. त्यामुळे याही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, या परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने या परिसरातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत.

हेही वाचा - सिंधुदुर्ग: चिपी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे धूसर, पालकमंत्र्यांवर विरोधकांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details