सिंधुदुर्ग- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पूर बाधित लोकांशी संवाद साधत त्यांनी लोकांची विचारपूस केली. तसेच शिवसेना आपल्या सदैव पाठीशी असल्याचा विश्वास दिला. दरम्यान, बांदा येथील विठ्ठल मंदिरात पूरग्रस्तांशी संवाद साधताना लोकांमध्ये बसून त्यांनी पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना भांडी, डाळ, तांदूळ, चटई, चादर, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीच्या धनादेशाचे वितरण देखील केले. विशेष म्हणजे कोकणातील पुरपरिस्थिती नंतर कोणत्याही पक्षाचा नेता या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला.