महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

५ लाखांच्या मुद्देमालासह एक जण ताब्यात, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

आंबोली घाट मार्गावरुन अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापुर उपायुक्त आणि सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

By

Published : May 13, 2019, 7:23 PM IST

सिंधुदुर्ग- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने आंबोली रस्त्यावर दाणोली बाजारपेठ येथे रविवार रात्री ११ वाजता गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात ३ लाख रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैधरित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी नामदेव भिमाना सावंत (वय ४८) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आंबोली घाट मार्गावरुन अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापुर उपायुक्त आणि सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे यांच्या पथकाने रविवारी रात्रीपासून आंबोली घाट मार्गावर सापळा रचला. दरम्यान रात्री ११ च्या सुमारास आंबोली घाट मार्गे जाणाऱ्या संशयित टाटा सूमो गाडीला पथकाने थांबण्याचा ईशारा केला.

दाणोली बाजारपेठ येथे पथकाने सदर गाडीची तपासणी केली. तपासणी दरम्यान सूमो कारमध्ये २ लाख ५८ हजार रुपयांचे गोल्डन एस ब्ल्यू फाइन व्हिस्कीचे ४३ बॉक्स, २४ हजार रुपयांचे टुबर्ग स्ट्रॉन्ग बिअरचे १० बॉक्स, १८ हजार रूपये किमतीचे आय.बीचे २ बॉक्स अशी एकूण ३ लाख रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू सापडली. त्यामुळे भरारी पथकाने अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनदेखील ताब्यात घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details