सिंधुदुर्ग- गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गला मुसळधार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने गेले सात ते आठ दिवस धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे निर्मला नदीवरील ब्रिटिश कालीन आंबेरी पूलदेखील पाण्याखाली गेला होता. नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा तडाखा या पुलाला बसला आ्हे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
पाण्याच्या तडाख्यानंतर आंबेरी ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीसाठी धोकादायक; प्रशासनाचे दुर्लक्ष
२७ गावांना कुडाळ तालुक्याशी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सुरू असते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आंबेरी पुलाच्या सुरक्षितेवरून संभ्रम निर्माण झाला आहे.
पुलावरील पाणी ओसरल्यानंतर खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी पुलाची पाहणी केली. यावेळी आंबेरी पुलाला काही ठिकाणी भगदाड पडल्याचे दिसून आले. तसेच पुलाचा भरावही काहीअंशी वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ग्रामस्थांनी याची माहिती दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पुलाची पहाणी केली. पाहणी नंतर बांधकाम विभागाने ग्रामस्थांना कोणत्याही खबरदारीच्या सूचना दिलेल्या नाहीत.
२७ गावांना कुडाळ तालुक्याशी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सुरू असते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आंबेरी पुलाच्या सुरक्षितेवरून संभ्रम निर्माण झाला आहे.