महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेल्फीच्या नादात तरुण दरीत कोसळला, तब्बल 25 तास दिली मृत्यूशी झुंज - young man fell into the valley

जागतिक निसर्ग वारसा स्थळ असलेल्या कास पठाराजवळ, गणेशखिंड येथे सेल्फी काढण्याच्या नादात २२ वर्षीय तरुण दरीत कोसळला. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याला तब्बल २५ तासानंतर दरीतून काढण्यात साताऱ्यातील रेस्क्यू टीमला यश आले आहे.

कास
कास

By

Published : Jul 9, 2021, 9:30 PM IST

सातारा - जागतिक निसर्ग वारसा स्थळ असलेल्या कास पठाराजवळ, गणेशखिंड येथे सेल्फी काढण्याच्या नादात २२ वर्षीय तरुण दरीत कोसळला. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याला तब्बल २५ तासानंतर दरीतून काढण्यात साताऱ्यातील रेस्क्यू टीमला यश आले आहे.

सेल्फीच्या नादात तरुण दरीत कोसळला, तब्बल 25 तास दिली मृत्यूशी झुंज

सेल्फीच्या नादात तरुण कोसळला दरीत

कनिष्क सचिन जांगळे (रा. यादोगोपाळ पेठ, समर्थमंदीर सातारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी तो कास रस्त्यावर फिरायला गेला होता. यवतेश्वरजवळच्या गणेशखिंडीत तो कड्याच्या बाजूला गेला. तीथे त्याला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही आणि तोल जाऊन तो दरीत कोसळला. ही बाब काही नागरिकांनी पाहिली असता त्यांनी पोलिसांना माहिती घटनेची दिली.

तब्बल २५ तास हा तरुण जखमी अवस्थेत दरीमध्ये होता पडून

कुटुंबियांनी शोधाशोध केली असता गणेशखिंडीतील मंदीराजवळ त्याची दुचाकी आढळली. दरीत शोध घेतला असता सुमारे ६०० फुटांवर कोणीतीरी पडले असल्याचे लक्षात आले. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी आज परिस्थितीची पाहणी व मदत कार्याच्या साहित्याची जुळवाजुळव करुन दुपारी ३ वाजता मदतकार्य सुरू केले. एक जवान खोल दरीत उतरला. क्रेनच्या सहाय्याने जखमी तरुणाला बाहेर काढण्यात रात्री साडेसात वाजता यश आले. तब्बल २५ तास हा युवक जखमी अवस्थेत दरीमध्ये पडून होता. दरम्यान, पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात भरती केले. बचाव कार्यात शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे विक्रम पवार (पापा), चंद्रसेन पवार, देवा गुरव, सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ व अभिजित शेलार यांचा सहभाग होता.

हेही वाचा - Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या

हेही वाचा - NEW PRIVACY POLICY अंमलबजावणीकरता व्हॉट्सअपचे पुन्हा एक पाऊल मागे

ABOUT THE AUTHOR

...view details