महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव - सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीकडे पाहता, सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला..

साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By

Published : Nov 12, 2019, 4:35 PM IST

सातारा -जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट मदत मिळावी, यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला आहे.

हेही वाचा... लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल.. प्रकृती स्थिर

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सभागृहात संपन्न झाली. जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सभेत सर्वच सदस्यांनी केली. त्यानंतर याबाबतचा ठराव देखील करण्यात आला.

हेही वाचा... आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर

या सभेत अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने बांधण्यात आलेले पाझर तलाव व बंधार्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अशा इतर नुकसानींचे त्वरित पंचनामे करून त्याची एकत्रीत माहिती शासनाकडे पाठवण्याच्या सूचना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details