कराड (सातारा) -उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पुर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणाच्या नदी विमोचकामधून आज सकाळी प्रति सेकंद २०९८ घनफूट इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटणार
कडक उन्हाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी ( demand for water for irrigation ) वाढली आहे. कोयना धरणातील पाण्याचा लाभ पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी ( water from Koyna Dam ) होतो. सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाल्यामुळे आज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने ( management of Koyna dam ) दिली.
हेही वाचा-Koyna river in Karad : कराड तालुक्यातील दोघांचा कोयना नदीत बुडून मृत्यू