महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणाचे सहा दरवाजे तिसऱ्या दिवशीही ४ फुटांवरच; ९५ टीएमसी पाणीसाठा - कोयणा धरण पाणीसाठा बातमी

कोयना धरण परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात आजच्या घडीला ९५.७९ टीएमसी व ९०.६७ उपयुक्त इतका पाणीसाठा झाला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 24, 2020, 3:54 AM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने शिवाजीसागर जलाशयात तब्बल 57 हजार 573 क्युसेक्स प्रतिसेकंदपर्यंत पाण्याची आवक वाढली आहे. पावसाचे वाढते प्रमाण पाहता धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण राखण्यासाठी तिसऱ्या दिवशीही कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 4 फुटांवर खुले ठेवण्यात आले आहेत. पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर 2 हजार 100 आणि वक्र दरवाजातून 25 हजार 919 क्युसेक्स असा एकूण 28 हजार 19 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरूच ठेवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

कोयना धरण परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात आजच्या घडीला 95.79 टीएमसी व 90.67 उपयुक्त इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप 9.46 टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता असली तरी पावसाचे वाढते प्रमाण आणि पाण्याची आवक लक्षात घेता 95 टीएमसीपर्यंत पाणीसाठा स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पावसाची संततधार सुरूच असल्याने रविवारीही कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 4 फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 व सहा वक्री दरवाजातून 25 हजार 919 असा एकूण 28 हजार 19 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरूच ठेवला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून प्रतिसेकंद 57 हजार 573 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details