महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात मतदानाला सुरुवात, लोकसभा पोटनिवडणुकीकडे राज्याचं लक्ष - सातारा लोकसभा पोटनिवडणूक

सातारा लोकसभा पोटनिवडणूक व  विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढवत आहेत.

साताऱ्यात मतदानाला सुरुवात

By

Published : Oct 21, 2019, 10:32 AM IST

सातारा - सातारा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढवत आहेत. शिवेंद्रराजे भोसले हे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

साताऱ्यात मतदानाला सुरुवात


आज सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. याचा निकाल २४ ऑक्टोबरला लागणार आहे. आज सकाळी साताऱ्यात ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच पावसाची रिपरीप चालू असल्याने मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क? -
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details