महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युवा वर्गात उदयनराजेंची वेगळीच क्रेझ; कराडमध्ये कॉलेजमध्ये तरुणांशी साधला संवाद - student bike rally

कराड येथील महाविद्यालयात भेट देण्यासाठी ते शनिवारी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी बाईकची रॅली काढली.

कराडमध्ये कॉलेजमध्ये तरुणांशी संवाद साधला

By

Published : Mar 23, 2019, 9:05 PM IST

सातारा - युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघता उदयनराजे भोसले यांना कोणत्या विषयावरती बोलावे, हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी बाईकची रॅली काढली होती


लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व मतदार तसेच युवकांशी संवाद साधण्यासाठी भोसले या भेटीगाठी करत आहेत. कराड येथील महाविद्यालयात भेट देण्यासाठी ते शनिवारी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी बाईकची रॅली काढली. यावेळी त्यांनी भोसले यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. विद्यार्थी वर्गातील उत्साह पाहता जिल्ह्यात उदयनराजेची क्रेज पुन्हा एकदा दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details