सातारा :भाजपा नेते उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे त्यांच्या खास शैलीमुळे कायमच चर्चेत असतात. मजेदार स्टाईल आणि हटके बोलण्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आज मात्र, उदयनराजेंचा एक खास अंदाज पाहायला मिळाला आहे. आज उदयनराजे भोसले यांच्या लग्नाचा वाढदिवस (happy anniversary) आहे. यामुळे त्यांनी फेसबूकवर पोस्ट (Facebook Post) शेअर करत पत्नीलाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Udayanraje bhosale wish happy anniversary to wife from in special style) दिल्या आहेत. Marriage Anniversary Wishes
उदयनराजेंनी दिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते. ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली, असं म्हणत उदयनराजेंनी पत्नीचं कौतूक केलं आहे. राजकारणात आलं की, तसा कुटुंबासाठी फार वेळ मिळत नाही. पण या सगळ्यात पत्नीने मोलाची साथ दिल्याचं उदयनराजेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी दोघांचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे.
Marriage Anniversary Wishes दमयंतीराजे भोसले असं उदयनराजेंच्या पत्नीचं नाव आहे. राणीसाहेबांच्या भक्कम साथीमुळेच मतदारसंघातील व राज्यातील असंख्य लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळतं, असंही उदयनराजेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. उदयनराजेंच्या या फेसबूक पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी तुफान लाईक आणि कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या पत्नीचं कौतूक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उदयनराजेंनी दिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पोस्टमध्ये काय म्हणाले उदयनराजे भोसले?:लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर करत पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी लिहलं की, ‘आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते. ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली…त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील असंख्य लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळते'. Marriage Anniversary Wishes