सातारा- छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू आहे. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, "चार भिंतीच्या आत बसायला आपण काय कार्टून वाटलो होय..! मला व्हायचे असते तर मी त्या हिशोबानी पावले टाकली असती, आपला मी निवांत आहे." असे उत्तर दिले.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? यावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले... - छत्रपती शिवाजी महाराज
सातारा येथील पत्रकार परिषदेत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्याला मुख्यमंत्री बनायला आवडेल का...? असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत उत्तर देऊन धमाल उडवून दिली.
खासदार उदयनराजे भोसले
सातारा येथील पत्रकार परिषदेत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्याला मुख्यमंत्री बनायला आवडेल का...? असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, " मुख्यमंत्री कार्यालय जर कास येथे घेणार असाल तर आपली तयारी आहे. मग येऊ द्या सगळ्यांना", अशा शब्दात राजेंनी उत्तर देऊन आपल्या शैलीत धमाल उडवून दिली.