सातारा - जर सातारा लोकसभा मतदार संघात शरद पवार उभे राहिले तर, मी उभा राहणार नाही, ते मला वडिलांच्या स्थानी आहेत, असे नुकतेच भाजपात गेलेले उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. माध्यम प्रतिनिधींनी शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांचा डोळ्यात पाणी आले.
...अन् उदयनराजे यांना रडू कोसळले - NCP news
जर सातारा लोकसभा मतदार संघात शरद पवार उभे राहिले तर, मी उभा राहणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. यावेळी भावूक झाले होते.
उदयनराजे भोसले
मला काही नको फक्त पवार साहेबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी, असे भावनिक होऊन माध्यमांना सांगितले आहे. २ दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या सातारा येथे झालेल्या रॅलीने राज्यभरात मोठा धक्का दिला आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी आणि युवा वर्गाची साथ बघता येणाऱ्या काळात अनेक राजकीय नेते मंडळींची राजकीय वाटचाल नक्कीच बदली जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा - साताऱ्यात शरद पवारांचे जंगी स्वागत
Last Updated : Sep 24, 2019, 5:10 PM IST