सातारा- राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघा बंधूंनी आज एकत्रितरित्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केले. शिवेंद्रराजे यांनी जावळी मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज भरला तर, उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला.
उदयनराजेंनी लोकसभेचा तर शिवेंद्रराजेंनी विधानसभेसाठी भरला अर्ज - सातारा विधानसभा निवडणूक
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघा बंधूंनी आज एकत्रितरित्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केले.
उदयनराजेंनी लोकसभेचा तर शिवेंद्रराजेंनी विधानसभेचा भरला अर्ज
हेही वाचा - 'दोन्ही' राजे अर्ज भरण्यासाठी रॅलीत सामील; साताऱ्यात भोसले घराण्याचे शक्तीप्रदर्शन
भाजपवासी झालेल्या या दोन्ही बंधूंनी काही दिवसांपूर्वीच राजीनामे दिले होते. ते आता भाजपकडून निवडणुका लढणार आहेत. या दोघांनी आपल्या हजारो समर्थकांसह आज अर्ज दाखल केले.