महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अशी ही साताऱ्याची तऱ्हा! आता तरी मनोमिलन होणार का? - vidhansabha election 2019

शिवेंद्रराजे भाजपत गेल्यानंतर त्यांचं राजकीय वजन वाढेल ही भीती कदाचीत उदयनराजेंना असावी. म्हणून त्यांना शह देण्यासाठी उदयनराजे त्यांच्या पाठोपाठ भाजपत गेले. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आल्यानंतर हे दोन्ही भाऊ पुन्हा एका व्यासपीठावर आले. आमच्यात कोणताही वाद नसल्याचे ते म्हणाले. परंतु हा सत्तासंघर्ष वेळोवेळी सातारकरांनी अनुभवला आहे.

छत्रपतींच्या घरण्यातील भाऊबंदकी: दोन पिढ्ंयाचा सत्ता संघर्ष

By

Published : Sep 19, 2019, 3:50 PM IST

Updated : Sep 19, 2019, 4:56 PM IST

मुंबई- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या स्टाईल, बेधडक निर्णय आणि वक्तव्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज असल्यानं मराठा समाजात आणि विशेषत: युवकांमध्ये त्यांची क्रेज आहे. आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी ते नेहमीच चर्चेत असतात. राजे कधी काय बोलतील, करतील याचा नेम नाही. त्यांची राजकीय कारकिर्द तितकीच वादग्रस्त ठरली की जितकं त्यांचं व्यक्तीगत आयुष्य. उदयनराजे आणि त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंह राजे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे.

उदयनराजे एक वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणुन ओळखल्या जातात. साताऱ्यात उदयनराजे आणि त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंह राजे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. अभयसिंहराजे भोसले यांच्या राजकीय कारकिर्दी सोबतच या वादाला सुरूवात झाली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अभयसिंहराजे म्हणजेच उदयनराजेंचे काका. शिवेंद्रसिंहराजे हे त्यांचेच पुत्र. साताऱ्याच्या राजकारणातील वर्चस्वासाठीची या राजघराण्यातील अंतर्गत कलह शिगेला पोहोचला होता. 1989 मध्ये उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांनी अभयसिंहांविरूध्द शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला. सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीत उदयनराजेंनी अभयसिंहांच्या पॅनल विरोधात स्वत:चं पॅनल उभे केले. काका-पुतण्याच्या या वादात अधिकच भर पडली ती 1996 सालच्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी. तेव्हा हिंदुराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेकडून तर प्रतापराव भोसले काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले. उदयनराजेंनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटले. अभयसिंह हे काँग्रेसमध्ये असल्याने त्यांनी उदयनराजेंचा प्रचार न करता प्रतापराव भोसलेंचा प्रचार केला. या मुळे उदयनराजे नाराज झाले होते. त्यानंतर झालेल्या 1998 च्या लोकसभा निवडणुकीत अभयसिंह खासदार झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या सातारा विधानसभेच्या जागेवर उदयनराजेंनी दावा केला. परंतु त्यांच्या ऐवजी काँग्रेसने त्यांचे चुलतभाऊ शिवेंद्रराजेंना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर भाजपच्या तिकीटावर ते निवडूनही आले. नंतर युतीच्या काळात ते राज्यमंत्री सुध्दा होते.

एकुण दोन पिढ्यांपासून सुरू असलेला वाद मिटवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. दरम्यान, हे देन्ही भाऊ राष्ट्रवादीत असताना शरद पवारांना मध्यस्थी करण्यात यश आले. त्यांनी या दोन्ही भावांत वेळोवेळी मनोमिलन घडवुन आणले. परंतु आता हे दोन्ही भाऊ भाजपत गेले. शिवेंद्रराजे भाजपत गेल्यानंतर त्यांचं राजकीय वजन वाढेल ही भीती कदाचीत उदयनराजेंना असावी. म्हणुन त्यांना शह देण्यासाठी उदयनराजे त्यांच्या पाठोपाठ भाजपत गेले. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आल्यानंतर हे दोन्ही भाऊ पुन्हा एका व्यासपीठावर आले. आमच्यात कोणताही वाद नसल्याचे ते म्हणाले. परंतु हा सत्तासंघर्ष वेळोवेळी सातारकरांनी अनुभवला आहे. त्यांच्यातील हे राजकीय वैर कायमस्वरूपी थंड करण्यात आता भाजपमधील नेत्यांना यश मिळेल का, अशी चर्चा आता साताऱ्यातील नागरिकांत आहे.

'माय स्टाईल' म्हणत कॉलर उडवणारे उदयनराजे कधीच कोणाला जुमानत नाहीत. मला हवं तसंच मी रहाणार, कोण काय म्हणतं, मला फरक पडत नाही, असं ते नेहमी म्हणत असतात. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते एकदम चर्चेत आले. उदयनराजे 2009 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर सातारा मतदारसंघातून निवडणूक लढले आणि 3 लाखांच्या फरकाने निवडुण आले होते. 2014 मध्येही ते निवडूण आले होते.

Last Updated : Sep 19, 2019, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details