महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिस्तुल व गावठी कट्ट्यासह दोघा तरुणांना अटक, तीन जिवंत काडतुसांसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त... - भोसरी

बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगल्या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघांना अटक केली असून १ पिस्तुल व गावठी कट्यासह ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी प्रतीक लकडे (22) ,राहणार खंडोबाचीवाडी व स्वप्नील जाधव (22), राहणार भोसरी, सातारा या दोघा तरुणांजवळ पिस्तुल सापडल्या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापडलेल्या पिस्तुल व गावठी कट्ट्यासह दोघे तरुण आरोपींची छायाचित्रे

By

Published : Jun 6, 2019, 3:50 PM IST

सांगली- बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगल्या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघांना अटक केली असून १ पिस्तुल व गावठी कट्यासह ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सांगली शहरातील मध्यवस्तीमध्ये फिरत असताना गुंड विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.


शहरातील शंभरफुटी रोडवरील शामरावनगर येथे पिस्तुल घेऊन दोघेजण येणार असल्याची माहिती सांगली पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयीत दुचाकीस्वार दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे १ पिस्तुल, १ गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे मिळालीत. यावेळी पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडील दोन्ही रिव्हॉल्व्हर, काडतुसे, आणि दुचाकी जप्त केली आहे. एकूण दीड लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रतीक लकडे (22) ,राहणार खंडोबाचीवाडी व स्वप्नील जाधव (22), राहणार भोसरी, सातारा या दोघा तरुणांजवळ पिस्तुल सापडल्या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details