सातारा - सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील वृद्धा व कोंडवे येथील युवकाचा पाण्यातून वाहून गेल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या बळींची संख्या 24 झाली आहे.
सातारा तालुक्यात अतिवृष्टीचे दोन बळी; जिल्ह्यातील बळींची संख्या 24
रळी खोऱ्यातील बुद्रुक येथील सुमल विठ्ठल लोटेकर (वय ७०) ही वृद्धा आज सकाळी गुरांना चारायला घेऊन गेली होती. परळी येथील उरमोडी नदीच्या पुरात त्या वाहून गेल्या. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने त्यांचा भर पावसात शोध घेतला. घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमिटर अंतरावर, उरमोडी बॅक वॉटरमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
उरमोडी धरणात वृद्धेचा मृतदेह
परळी खोऱ्यातील बुद्रुक येथील सुमल विठ्ठल लोटेकर (वय ७०) ही वृद्धा आज सकाळी गुरांना चारायला घेऊन गेली होती. परळी येथील उरमोडी नदीच्या पुरात त्या वाहून गेल्या. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने त्यांचा भर पावसात शोध घेतला. घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमिटर अंतरावर, उरमोडी बॅक वॉटरमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
साताऱ्यात युवक वाहून गेला
दुसरी घटना सातारा शहराजवळ घडली. अमन इलाही नालबान (वय २२, रा. कोंडवे) असं मृत युवकाचं नाव आहे. काल रात्री तो शाहूपुरी- सारखळ रस्त्यावरुन दुचाकीवरुन निघाला होता. दिव्यानगरीजवळ पुलावर रस्ता खचुन भगदाड पडले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याच्या ते लक्षात आले नसावे. प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. आज सकाळी त्याच्या चपला ओढ्याजवळ आढळल्या.
रेस्क्यू टीमचे परिश्रम
खबर मिळताच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने आज दुपारी अडीच वाजता शोधमोहीम सुरू केली. कोंडवे येथे पाच किलोमीटर अंतरावर हमदाबाज येथील एका ओढ्यामध्ये त्या युवकाचा मृतदेह आढळून आला. रेस्क्यू टीम मेंबर्स चंद्रसेन पवार, देवा गुरव, सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ, अभिजित शेलार, गणेश निपाणे यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा -कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, कराडमधील पूर ओसरला