सातारा- क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा 8 कोरोना संशयितांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे (सारी) मृत्यू झाला आहे. त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली असून त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
साताऱ्यात 'सारी'ने दोघांचा मृत्यू; तर कोरोना अद्याप प्रलंबित - सारी मृत्यू सातारा
सोमवारी रात्री उशिरा 8 कोरोना संशयितांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली असून त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
two-dead-due-to-sari-in-satara
हेही वाचा-कोरोना : तेलंगाना राज्यातील लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढवला
राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्याच्या कोनाकोपऱ्यातून कोरोनाचे दररोज नव्याने रुग्ण समोर येत आहेत. तर कोरोनामुळे काही नागरिकांचा मृत्यू देखील होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच राज्यात सारी या आजाराचेही रुग्ण आढळत आहेत. कोरोना आणि सारी आजाराच्या काही लक्षणामध्ये साम्य आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णाची कोरोना चाचणीही केली जात आहे.