सातारा - पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना 'हनी ट्रॅप' मध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचणार्या दोघा संशयितांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन लांडगे (रा. चाकण पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करून त्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा डाव शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे व सोमनाथ शेडगे या तिघांनी एका युवतीच्या मदतीने आखला होता. मात्र संबंधित युवतीनेच या प्रकाराची माहिती आमदारांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते -पाटील यांना दिली होती.