कराड (सातारा)- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे रविवारी सकाळी 8.30 वाजता धरणाचे दरवाजे 4 फुटाने उचलण्यात आले. धरणाचे सहा वक्र दरवाजे आणि पायथा वीज गृहातून 25,604 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यात वाढ करून सकाळी 11.00 वाजलेपासून कोयना धरणातून एकूण 35000 क्युसेक चा पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2.00 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेक करण्यात येईल. गेल्या 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना व कृष्णा नदीकाठच्या सर्वांनी कृपया दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन करण्यात आले आहे.
कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटांनी उचलले; 11 वाजल्यापासून 35000 क्युसेक पाण्याचा विसर्ग - karad rain news
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी 1 फूट 9 इंचाने उघडण्यात आले होते. परंतु, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे रविवारी सकाळी धरणाचे दरवाजे 4 फुटांनी उचलण्यात आले आहेत. वक्र दरवाजातून 23504 आणि पायथा वीज गृहातून 2100, असा एकूण 25,604 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी 1 फूट 9 इंचाने उघडण्यात आले होते. परंतु, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे रविवारी सकाळी धरणाचे दरवाजे 4 फुटांनी उचलण्यात आले आहेत. वक्र दरवाजातून 23504 आणि पायथा वीज गृहातून 2100, असा एकूण 25,604 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे कोयना-कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे. पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवक पाहून दिवसभरात विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे धरण व्यवस्थापनाने सूचित केले आहे.
कोयना धरणाची पाणी पातळी 2152.1 फूट आणि पाणीसाठा 90.57 टीएमसी झाला आहे. 59261 क्युसेक पाण्याची आवक आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 162, नवजा येथे 301 आणि महाबळेश्वर येथे 189 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.