सातारा: कोल्हापूर सातारा मार्गे मुंबईकडे जाणारी वाहणे ही कात्रज नव्या बोगद्यातून जातात. हा रस्ता कायम वाहता असतो. मुंबईकडे कात्रज नवीन बोगद्यातून जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी शनिवार आणि बुधवारी रात्री ११ ते २ या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिली आहे.
या मार्गाने वाहतूक वळवणार : व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी कात्रज नवीन बोगद्यातील वाहतूक शनिवारी आणि बुधवारी रात्री ११ ते २ बंद राहणार असल्यामुळे वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ते पाहता या दोन्ही दिवशी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी नवीन बोगद्यातील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग, कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे अशी माहितीही या वेळी देण्यात आली आहे.
साताऱ्याकडील वाहतुकीत बदल नाही :या बोगद्याच्या कामामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक प्रभावित होणार असली तरी मात्रमुंबईकडून सातान्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे. या मार्गावरील वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहितीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.