महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३५ वर - satara corona patient

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 35 वर पोहचली आहे.

corona virus
corona virus

By

Published : Apr 28, 2020, 8:30 AM IST

सातारा - उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.आता सातारा जिल्ह्यात 35 रुग्ण कोरोनाबाधित असून आतापर्यंत 4 कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 32, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 43, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 14 असे एकूण 98 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4,कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 9 असे एकूण 13 जणांना अनुमानित म्हणून सोमवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details