सातारा - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज दुपारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आज मुख्यमंत्री जनतेला संबोधीत करणार आहेत. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्र्यांचा जनादेश, उदयनराजे राहणार उपस्थित - cm devendra fadnavis
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज दुपारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आज मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्र्यांचा जनादेश,
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ते आज भाजपच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ल आहे. मात्र, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. आज होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.