महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला; १८ रिपोर्ट निगेटिव्ह

३५ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी तो मुंबई येथून गावी आला होता. काल दाखल केलेल्या इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचेही श्री. गडीकर यांनी सांगितले.

three person founded corona positive in satara
सातारा जिल्ह्यात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला; १८ रिपोर्ट निगेटिव्ह

By

Published : Apr 2, 2020, 8:41 PM IST

सातारा -कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये काल दाखल झालेल्या 19 अनुमानित रुग्णांपैकी एक ३५ वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना (कोव्हिड १९) बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित‍ांची संख्या ३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला; १८ रिपोर्ट निगेटिव्ह

काल 1 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते. त्याच्यासह 19 अनुमानित रुग्णांच्या नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले होते. ३५ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी तो मुंबई येथून गावी आला होता. काल दाखल केलेल्या इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचेही श्री. गडीकर यांनी सांगितले.

आज सायंकाळी 5 अखेर जिल्ह्यातील कोरोनाबाबतची स्थिती -

1. एकूण दाखल - 104


2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 73


3. कृष्णा हॉस्पिटल, कराड- 30


4. खासगी हॉस्पिटल- 1


5. कोरोना नमुने घेतलेले- 104


6. कोरोनाबाधित अहवाल - 3


7. कोरोनाअबाधित अहवाल - 97


8. अहवाल प्रलंबित - 4


9. डिस्चार्ज दिलेले- 97


10. सद्यस्थितीत दाखल- 7


11. आलेली प्रवाशी संख्या - 554


12. होम क्वारंटाईन व्यक्ती - 554


13. पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 401


14. 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 153


15. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 50


16. यापैकी डिस्जार्ज केलेले - 15


17. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात - 1


18. अद्याप दाखल - 34

ABOUT THE AUTHOR

...view details